Breaking
Updated: जानेवारी 17, 2026
स्कॉर्पिओच्या धडकेत ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : रस्त्यावर धोकादायक पद्धतीने ट्रॅक्टर उभे करून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी एका अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धारूर येथील सत्यप्रेम रघुनाथ तिडके हे माजलगाव आगारात बस चालक म्हणून कार्यरत आहेत. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ९:५५ च्या सुमारास ते आंबेवडगाव रस्त्यावरून बस घेऊन जात असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला बस पाठीमागून धडकली. संबंधित ट्रॅक्टर चालकाने रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल आणि दुसऱ्याच्या जीवितास धोका होईल अशा पद्धतीने वाहन उभे केले होते. या अपघातात तिडके यांच्या डोक्याला आणि नाकाला गंभीर दुखापत झाली आहे. उपचारांनंतर तिडके यांनी १६ जानेवारी रोजी तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलीस हवालदार भागवत पुढील तपास करत आहेत.