Breaking

पूसमध्ये घरफोडी, सोन्याच्या दागिन्यासह बोकडही चोरले

Updated: मार्च 14, 2026

By Vivek Sindhu

पूसमध्ये घरफोडी, सोन्याच्या दागिन्यासह बोकडही चोरले

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: तालुक्यातील पुस येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून ५५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि मोबाईलचा समावेश आहे. याप्रकरणी इस महम्मद शेख (वय ५०) यांच्या तक्रारीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१२ ते १३ मार्चच्या दरम्यान ही घरफोडी झाली. फिर्यादी घराबाहेर असताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून ५० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. तसेच आखाड्यावरील ५००० रुपये किमतीचे एक बोकड आणि एक मोबाईल फोनही चोरून नेला.

या चोरीमुळे पुस परिसरात खळबळ माजली आहे. पोलीस उपनिरीक्षक मुळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


Categories

Recent Posts