Breaking
Updated: एप्रिल 10, 2026
पिंपळनेर येथे घरफोडी; सव्वा दोन लाखांचे दागिने व रोकड लंपास
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: पिंपळनेर येथे अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
बळी वाकसाहेब वरपे (वय ३६, रा. पिंपळनेर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. दि. ८ एप्रिलच्या रात्री अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने बेडरूममधील कपाटाचे लॉकर तोडून त्यातील १ लाख ३५ हजार रुपये रोख (५०० व १०० रुपयांच्या नोटा) आणि १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (दोन अंगठ्या व कानातील रिंग) असा एकूण २ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. पिंपळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ग्रेड पोलीस उपनिरीक्षक गर्जे या प्रकरणाचा तपास करत आहेत.