Breaking
Updated: एप्रिल 4, 2026
दारूसाठी पैसे न दिल्याने सख्ख्या भावाची कार फोडली
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज: केज तालुक्यातील साळेगाव बसस्थानक परिसरात दारू पिण्यासाठी पैसे आणि चारचाकी गाडी न दिल्याच्या रागातून सख्ख्या भावानेच आपल्या भावाला मारहाण करून गाडीच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे. अहमद बाबुलाल शेख (वय ५२) यांनी याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २६ मार्च रोजी सकाळी ८ च्या सुमारास ही घटना घडली.
आरोपी इलाही बाबुलाल शेख याने अहमद शेख यांच्याकडे दारूसाठी पैसे आणि त्यांची गाडी मागितली होती. नकार दिल्याने आरोपीने अहमद यांना खाली पाडले, ज्यामध्ये त्यांच्या मनगटाला फ्रॅक्चर झाले. तसेच फिर्यादीच्या चारचाकी गाडीच्या काचा फोडून सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान केले. आरोपीने शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकीही दिली. केज पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार १००९ मुरकुटे तपास करत आहेत.