Breaking

बोरगावला शेतकऱ्याची आत्महत्या

Updated: सप्टेंबर 25, 2025

By Vivek Sindhu

बोरगावला शेतकऱ्याची आत्महत्या

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – मांजरा नदी काठी असलेल्या केज तालुक्यातील बोरगाव (बु.) येथील शेतकरी रमेश ज्ञानोबा गव्हाणे (वय ६२) या शेतकऱ्याने पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे हताश होऊन विद्युत तारेला स्पर्श करून आपली जीवनयात्रा संपविली.
सुर्डी येथील गणेश अंकुशे या शेतकऱ्याची म्हैस पाण्यात बुडून मृत्युमुखी पडली. तर नायगाव येथील महिला शेतकरी वर्षा सुरेश खोडसे यांची उंदरी नदीत म्हैस वाहून गेली. सोनेसांगवी येथील एका शेतकऱ्याची देखील म्हैस वाहून गेली आहे. विजयकुमार कातमांडे यांच्या पोल्ट्री शेडमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे शेडमधील २ ते ३ हजार कोंबड्या मृत्युमुखी पडल्या असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लाखा येथील रघुनाथ माणिक रामिष्ठ या शेतकऱ्याने काढून ठेवलेल्या सोयाबीनची गंज डोळ्या देखत वाहून गेली. तर गावातील घरात पाणी शिरले आहे.


Categories

Recent Posts