Breaking
Updated: एप्रिल 11, 2026
जयभीम महोत्सवा निमित्त २० रक्तदात्यांचे रक्तदान आणि रुग्णांना फळ वाटप
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – केज शहरात दिपकभाऊ युवा मंचच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त उपजिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात २० रक्तदात्यांनी रक्तदान केले आणि रिपाइंचे केज तालुकाध्यक्ष दीपक कांबळे व कार्यकर्त्यांनी रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
या रक्तदान शिबिराचे अध्यक्षस्थानी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय केंद्रे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष दीपक कांबळे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. केशव इंगोले, लखन हजारे, माजी नगरसेवक कपिल मस्के, बबलू साखरे, अशोक गायकवाड, शेखर सिरसट, प्रवीण मस्के, सुदेश सिरसट, प्रकाश मस्के, दादासाहेब ससाणे, रक्तपेढीचे प्रमुख श्रीकृष्ण नागरगोजे, रमेश निशिगंध, दिलीप बनसोडे, हरेंद्र तुपारे, रोहीत कांबळे, रंजीत कांबळे, सुरज काळे, राहुल काळे, प्रदिप शिनगारे, शोयब शेख, निसार सय्यद, विनोद गायकवाड, मिटू सरवदे, बाळासाहेब कांबळे, सुशिल कांबळे, किशोर कांबळे, सुमित कांबळे, जयपाल रोकडे, संभाजी हजारे, अनंत काळे, वैभव जाधव, अभिषेक जाधव, शंकर निर्मळ, अबु शेख, संगम कांबळे, शाम गुळवे, भीमा शिनगारे, जमीर शेख यांच्यासह केज तालुका सरचिटणीस गौतम बचुटे आणि रक्तदाते उपस्थित होते.