Breaking
Updated: एप्रिल 11, 2026
पिंपळनेरमध्ये अडीच लाखांची घरफोडी; सुनेवर चोरीचा संशय
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: शहरातील लहुजी चौक परिसरात केवळ पैशांच्या वादातून एका तरुणावर वस्तऱ्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना नऊ एप्रिल रोजी उघडकीस आली आहे. आरोपींनी पैशांची मागणी पूर्ण न झाल्याच्या रागातून श्रीकांत गौरी या तरुणाच्या दोन्ही हातांवर वस्तऱ्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले.
अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दहा एप्रिल रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी श्रीकांत गौरी यांच्याकडे प्रताप जाधव आणि अजय पवार या आरोपींनी तीनशे रुपयांची मागणी केली होती. मात्र, आपल्याकडे केवळ दीडशे रुपये असल्याचे फिर्यादीने सांगताच आरोपींनी संतापून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. याच दरम्यान आरोपी अजय पवार याने आपल्याजवळील वस्तऱ्याने फिर्यादीच्या दोन्ही हातांवर वार करून त्यांना रक्तबंबाळ केले. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.