Breaking
Updated: ऑक्टोबर 17, 2025
बीड पोलीस दलाचे अद्यावत संकेतस्थळ नागरिकांच्या सेवेत
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड : नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि तत्पर पोलीस प्रशासन घडविण्याच्या उद्देशाने बीड जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत संकेतस्थळ beedpolice.gov.in हे अद्यावत करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून साकारलेले हे संकेतस्थळ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना पोलीस सेवांचा सुलभ लाभ देण्यासाठी सुरू करण्यात आले आहे.
या नव्या संकेतस्थळावर नागरिकांना विविध सेवा आणि सुविधांचा लाभ एका क्लिकवर मिळू शकतो. यात पुढील सुविधा उपलब्ध आहेत:
संवाद QR कोडच्या माध्यमातून नागरिक थेट पोलीस अधीक्षकांना तक्रार किंवा अभिप्राय पाठवू शकतात. संबंधित तक्रारीवर 24 तासांच्या आत पोलिसांकडून संपर्क साधला जाईल. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांची माहिती या संकेतस्थळावर पाहता येते.
तसेच नागरिकांना आपल्या जवळच्या पोलीस ठाण्याचे नाव व स्थान (लोकेशन) एका क्लिकवर पाहता येते. ऑनलाईन तक्रार नोंदणी, सायबर तक्रार नोंदणी, मोबाईल हरवला किंवा चोरी झाल्याची नोंद, भाडेकरूंची माहिती, हरवलेल्या वस्तूंची नोंद, अपघात भरपाईसाठी अर्ज प्रक्रिया, पारपत्र (पासपोर्ट) स्थिती यांसारख्या नागरी सुविधा देखील उपलब्ध आहेत.
याशिवाय नागरिकांसाठी उपयुक्त संकेतस्थळे, माहितीचा अधिकार, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आदी माहितीचे दुवे (links) या संकेतस्थळावर दिलेले आहेत.
beedpolice.gov.in या अद्यावत संकेतस्थळामुळे नागरिकांना दैनंदिन पोलीस सेवांची माहिती आणि सुविधा घरबसल्या मिळणार असून, बीड जिल्हा पोलीस दल आणि नागरिक यांच्यातील संपर्क अधिक प्रभावी आणि पारदर्शक होण्यास हातभार लागणार आहे.