Breaking

बीडच्या पालीतील कॅनरा बँक फोडली

Updated: ऑक्टोबर 30, 2025

By Vivek Sindhu

बीडच्या पालीतील कॅनरा बँक फोडली

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

साडेअठरा लाखांची रोकड लंपास

बीड – तालुक्यातील पाली येथे गुरुवारी पहाटे चोरट्यांनी कॅनरा बँकेत धाडसी चोरी केली. या घटनेत जवळपास अठरा लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास बँकेच्या मागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने लॉकर तोडून रोकड काढून नेली. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चोरट्यांनी वापरलेली साधने व पावलांचे ठसे, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे.


Categories

Recent Posts