Breaking
Updated: जानेवारी 22, 2026
अनुष्का पाटोळेला न्याय द्या -- राजुभाऊ थाटे
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअनुष्का पाटोळेला न्याय द्या – राजुभाऊ थाटे
गौतम बचुटे/केज :- लातूर येथील नवोदय विद्यालयात इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत असलेली अनुष्का पाटोळे हिला व्यस्थापन करीत असलेल्या प्राचार्य, कर्मचारी, यांनी बेल्टनी बेदम मारहाण केली. त्यात तिचा मृत्य झाला. त्या नंतर त्यांनी तिने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला. या घटनेच्या निषेधार्थ भिमराज सेनेचे प्रमुख राजाभाऊ थाटे यांनी लातूर ते मंत्रालय मुंबई असा लाँग मार्च काढला आहे.
दि. २६ मार्च रोजी तो लाँग मार्च मंत्रालयावर जाणार आहे. दरम्यान २१ जानेवारी रोजी राजाभाऊ थाटे यांचा लाँग मार्च केजमध्ये आला होता. त्यावेळी राजाभाऊ थाटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
यावेळी त्यांच्या सोबत रिपब्लिकन पार्टीचे तालुकाध्यक्ष दीपक कांबळे, बाबुराव गालफाडे, सरचिटणीस गौतम बचुटे, दिलीप बनसोडे, हरेंद्र तुपारे, यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे चंद्रकांत मस्के, आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना राजाभाऊ पाटोळे यांनी अनुष्का पाटोळे हिची आत्महत्या नसून तिचा या यंत्रणेने केलेला खून आहे आणि तिला न्याय मिळवून देणारच असे सांगितले. तर या वेळी दीपक कांबळे यांनी अनुष्का पाटोळेच्या हिच्या कुटुंबासोबत सर्व आंबेडकरी समाज सोबत असल्याचे नमूद केले. गौतम बचुटे आणि दिलीप बनसोडे यांनीही निषेध व्यक्त केला.