Breaking

भारतीय संविधानाचे रक्षण करा, अंधश्रद्धा सोडा तरच प्रगती शक्य

Updated: ऑक्टोबर 13, 2025

By Vivek Sindhu

भारतीय संविधानाचे रक्षण करा, अंधश्रद्धा सोडा तरच प्रगती शक्य

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांचे मत

अंबाजोगाई – “महापुरुषांचे विचार पुढे नेले नाहीत तर तोच त्यांचा खरा मृत्यू असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान टिकवण्यासाठी आणि समाजात बंधुभाव वाढवण्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या विचारधारेवर चालले पाहिजे,” असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी केले.भारतीय बौद्ध महासभा आयोजित
संविधान समर्थक समाज जोडो अभियानांतर्गत बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील नगर परिषदेच्या मुकुंदराज सभागृहात आज (दि. ११ ऑक्टोबर) आयोजित बौद्ध, मातंग, चर्मकार, ओबीसी बंधुभाव परिषदेत ते बोलत होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. आंबेडकर म्हणाले, “देशाचा प्रवास सध्या उलट्या दिशेने सुरू आहे. लिंबू-नारळ फोडण्यासारख्या गोष्टींमधून आपण बाहेर पडले पाहिजे. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपले हक्क सुरक्षित केले आहेत.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष २४० जागांच्या पुढे गेला नाही, ही ताकद बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची आहे. हे संविधान टिकवणे आपली सर्वांची जबाबदारी आहे.”
ते पुढे म्हणाले, “आपण महापुरुषांच्या विचारधारेवर चाललो नाही, म्हणूनच RSS सारख्या मनुवादी संघटना देशात डोके वर करिता आहेत. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा चालवली, त्यांचे कार्य आपण पुढे नेले पाहिजे.” कार्ल मार्क्सचे उदाहरण देत ते म्हणाले, “मार्क्सच्या अंत्यसंस्काराला फक्त अकरा लोक होते, पण आज त्यांची विचारधारा जगात पसरली आहे. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा आपण महाराष्ट्र आणि देशभर पोहोचवली पाहिजे.”
“महाराष्ट्र ही बहुजनांची कर्मभूमी आहे, मात्र आज राज्याची पुरोगामी ओळख पुसली जात आहे. बौद्ध चळवळीला अपेक्षित गती मिळत नाही. भारतीय बौद्ध महासभा आता उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातही काम करत असून, सम्राट अशोकाचे वंशज असलेला कुशवाह समाजही बौद्ध धम्माकडे आकर्षित होत आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
या परिषदेला भारतीय बौद्ध महासभेचे विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. देशात बंधुभाव आणि सलोखा निर्माण करण्यासाठी बौद्ध महासभा प्रयत्नशील असल्याचेही डॉ. आंबेडकर यांनी सांगितले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे बीड(पूर्व) चे अध्यक्ष एड.बीबी धन्वे सर होते.प्रमुख अतिथी व कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक म्हणून व्यासपीठावर भारतीय बौद्ध महाभेचे राज्य संघटक प्रा.डी. एस.नरसिंगे, राज्य संघटक प्रा.बापू गायकवाड, संरक्षण सचिव अमरसिंह डाका, मेजर जनरल राजेभाऊ आठवले,महालिंग निकाळजे,डॉ. संतोष बोबडे, प्राचार्य सुनील शिंदे,श्रीराम मोरे, काशिनाथ साळवे, श्याम वाघमारे,प्रतिभाताई तरकसे, माधव काळे,संभाजी सोनवणे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरवात सर्व आदर्शांच्या पूजनाने झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.बापू गायकवाड यांनी केले.उपस्थित पाहुण्यांचे स्वागत भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष बालासाहेब सोनवणे, भावनाताई कांबळे,शहराध्यक्ष सुधाकर हातागळे,द्वारकाताई कांबळे, डॉ. प्रतिमाताई वाकळे यांनी केले. बौद्ध धम्म स्वीकारलेल्या धम्म बांधवांचे स्वागत आदरणीय डॉ. भीमराव आंबेडकरानी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ देऊन केले. संघर्ष भूमी ची 2 एकर जागा समतासैनिक का करिता देणाऱ्या द्रुरोपदाबाई सरवदे यांचा ही सत्कार करण्यात आला. तसेच उप प्राचार्य गौतम गायकवाड लिखित” बुद्ध धम्म विचार आणि चिंतन”पुस्तकाचे प्रकाशन ही या वेळी करण्यात आले. स्वागत गीत देवदास सोनवणे लिखित अतिथी हा जयभीम घ्यावा हे गीत माधव काळे यांनी गायिले.
अमरसिंह डाका यांनी ही मनोगत व्यक्त केले. शेवटी अध्यक्षीय समारोपात एड.बी बी धन्वे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी तसेच सर्व धर्मांतरित बांधवांचे आभार मानले व भविष्यात आंबेडकरी चळवळीसाठी जोमाने कार्य करण्याचे आव्हान केले.
या परिषदे मध्ये समतासैनिक दलाचे डिव्हिजन आधिकारी डॉ. स्वप्नील महालंगिकर डिव्हिजन आधिकारी डॉ. संतोष बोबडे, डिव्हिजन आधिकारी यशपाल बचाटे ,
युनिट इंचार्ज मयूर धन्वे,रखमाजी जोगदंड यांनी सैनिकांचे नेतृत्व केले.मेजर आठवले यांनी डॉ. भीमराव आंबेडकर साहेबांना जनरल सलामी दिली.
परिषदे साठी राम कासारे आण्णा.प्रा.भिमानंद गजभारे, बाळासाहेब चव्हाण,बाळासाहेब खांडके,उद्धव गायकवाड, राजाभाऊ घाटे, सतीश मस्के,अर्जुन वाघमारे,निलेश शेवाळे, विशाल इंगळे, आनंद सरवदे,देविदास घोबाळे, भारत सातपुते, संजीवनी धन्वे,रत्नमाला तरकसे,पुष्पांताई गायकवाड, आयुष्यमाणिनी पोटभरे या सर्वानी सहकार्य केले. पंचशील बौद्ध विहार जयभीम नगर येथे स्नेहभोज घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा तालुका सरचिटणीस कवी गायक प्रा राहुल सुरवसे यांनी केले. या कार्यक्रमास माजलगाव , परळी , धारुर, केज ,बीड या भागातुन मोठ्या प्रमाणात उपासक आले होते


Categories

Recent Posts