Breaking

भारत फायनान्शियल इनक्ल्यूजन कंपनीला फिल्ड असिस्टंटने १६ लाखाला गंडविले

Updated: ऑक्टोबर 29, 2025

By Vivek Sindhu

भारत फायनान्शियल इनक्ल्यूजन कंपनीला फिल्ड असिस्टंटने १६ लाखाला गंडविले

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – केज तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील महिलांकडून फायनान्सचे गोळा केलेले १६ लाख ९ हजार ८६३ रुपये फिल्ड असिस्टंटने भारत फायनान्शियल इनक्ल्यूजन कंपनीकडे न भरता या रक्कमेचा अपहार करीत फसवणूक केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी फिल्ड असिस्टंटविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
भारत फायनान्शियल इनक्ल्यूजन कंपनीची केज शहरात शाखा असून या शाखेमार्फत तालुक्यातील विविध गावातील महिलांना फायनान्सचे पैसे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर कंपनीचे फिल्ड असिस्टंट अरबाज रशीदखाँ पठाण (रा. अजीजपुरा, केज जि.बीड) याने २३ ऑगस्ट २०२३ ते ३ मे २०२४ या काळात या विविध गावातील ७९ महिलांकडून फायनान्सचे १६ लाख ९ हजार ८६३ रुपये जमा केले. ही जमा केलेली रक्कम संबंधित कंपनीकडे न भरता या रक्कमेचा अपहार करीत कंपनीची फसवणूक केली. अशी तक्रार केज शाखेचे शाखाधिकारी श्रीहरी रविंद्र मुळे यांनी दिल्यावरून फिल्ड असिस्टंट अरबाज रशीदखाँ पठाण याच्याविरुद्ध केज पोलिसात अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे हे करीत आहेत.


Categories

Recent Posts