Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

भरधाव पिकअपची दिंडीतील महिलांना धडक; एक ठार, पाच जखमी

Updated: ऑक्टोबर 6, 2025

By Vivek Sindhu

पिकअपच्या धडकेत तरुण ठार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पाटोदा : रायमोहा-शिरुर कासार रोडवर रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दिंडीमध्ये चालणाऱ्या महिलांना भरधाव पिकअपने जोराची धडक दिली. या अपघातात एका महिलेला जागीच मृत्यू झाला असून पाच महिला गंभीर आणि किरकोळ जखमी झाल्या आहेत.

तारकेष्वर रामेष्वर गुळवे (वय 40, रा. मंत्री कन्स्ट्रक्शन, जुना मोंढा, बीड) यांनी पाटोदा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, 4 ऑक्टोबर रोजी बीडहून सुमारे 70 जणांची दिंडी तिर्थक्षेत्र नागनाथ मानूर येथे निघाली होती. दिंडीचा मुक्काम रायमोहा येथे झाला. दुसऱ्या दिवशी 5 ऑक्टोबर रोजी पहाटे 3.45 वाजता रायमोहा येथून शिरुर कासारकडे दिंडी निघाली असताना, रायमोहापासून अंदाजे 1 कि.मी. अंतरावर शिरुरकडून येणारा पिकअप (क्र. MH-12 LT 8588) भरधाव वेगाने येऊन दिंडीतील महिलांना धडकला.

या धडकेत राजश्री संतोश घेवारे (वय 45, रा. बीड) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अरुणा उमेश कळमकर (35), रुक्मीनी अमरनाथ कळमकर (45), वैश्णवी पशुपती भुरे (15), सुमन सिद्धेश्वर चिपाडे (40, रा. हिवरसिंगा) या महिला जखमी झाल्या. जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालय रायमोहा येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी राजश्री घेवारे यांना मृत घोषित केले. इतर जखमींना बीड येथील खाजगी व सरकारी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.

अपघातानंतर पिकअप चालक मिनीनाथ बबन खताळ (रा. टाकळी मानूर, ता. पाथर्डी, जि. आहिल्यानगर) याला घटनास्थळी नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी पाटोदा पोलिस ठाण्यात चालकावर निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवून मृत्यू व जखमी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


Categories

Recent Posts