Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

घराच्या बांधकामावरून मारहाण; एकावर गुन्हा

Updated: जानेवारी 29, 2026

By Vivek Sindhu

एसटी चालकाला मारहाण; बसची तोडफोड करून सरकारी कामात अडथळा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: चऱ्हाटा येथे घराचे बांधकाम का बंद ठेवले या कारणावरून एका व्यक्तीला विटेने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वैजिनाथ भानुदास वळकर (वय ४०, रा. चऱ्हाटा) हे आपल्या घरासमोर असताना आरोपी अजिनाथ भानुदास वळकर याने तिथे येऊन शिवीगाळ केली. आरोपीने बांधकामावरील विटेने फिर्यादीच्या डोक्यात आणि डाव्या खांद्यावर मारून जखमी केले. तसेच पुन्हा बांधकाम बंद केले तर जीवे मारण्याची धमकीही दिली.

फिर्यादीने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस हवालदार जायभाये या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts