Breaking
Updated: ऑगस्ट 23, 2025
ब्रह्माकुमारीजचे रक्तदान महाअभियान
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel
१७ ऑगस्ट रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी रक्तदान महाअभियानाचा केला राष्ट्रीय शुभारंभ
नवी दिल्ली – ब्रह्माकुमारीज संस्थेतर्फे सुरू करण्यात आलेल्या रक्तदान महाअभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे झाला. या अभियानांतर्गत भारत व नेपाळातील ६००० हून अधिक सेवा केंद्रांवर २२ ते २५ ऑगस्ट दरम्यान रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, एक लाख युनिट रक्तदान करण्याचा संकल्प आहे.
ही ऐतिहासिक मोहीम संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या १८व्या पुण्यतिथी व विश्वबंधुत्व दिन या निमित्ताने राबवली जात असून, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्याची अपेक्षा आहे. या अभियानाला भारत सरकारचे आरोग्य मंत्रालय, विविध रक्तपेढ्या, रुग्णालये, महाविद्यालये व सामाजिक संस्था यांचे सहकार्य लाभले आहे. शिबिरांचे गुगल मॅपद्वारे थेट मॉनिटरिंग करून पारदर्शकता व नोंदणी सुनिश्चित केली जाणार आहे.
अंबाजोगाई येथील स्थानिक सेवा केंद्रामार्फत रक्तदान कार्यक्रम दि. २५ ऑगस्ट, २०२५ सोमवार रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आनंद सरोवर ,वाघाळा रोड, अंबाजोगाई येथे राबविण्यात येणार असल्याचे सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी सुनिता दीदी यांनी सांगितले.या उपक्रमात सहभागी होणाऱ्या रक्तदात्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा उपलब्ध आहे त्याची लिंक https://tinyurl.com/raktadanAmbj अशी असून QR code ची सुविधा उपलब्ध असून ती शहरात मुख्य चौकात लावलेल्या बॅनर वर उपलब्ध आहे