Breaking
Updated: मार्च 14, 2026
पत्नी आणि सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून रिक्षाचालकाची आत्महत्या
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: तालुक्यातील सायगाव शिवारात एका शेतातील चंदनाचे झाड चोरून तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना बर्दापूर पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. या कारवाईत पोलिसांनी ७० हजार ६०० रुपयांच्या मुद्देमालासह दोन चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपींची नावे अमर सुंदर गायकवाड (वय २६) आणि अमोल कृष्णा गायकवाड (वय २२) अशी असून हे दोन्ही आरोपी अंबाजोगाई येथील सदर बाजार कैकाड गल्लीतील रहिवासी आहेत. याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार कोंडीबा म्हेत्रे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १३ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेच्या सुमारास बर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक घुले आणि त्यांचे पथक सरकारी वाहनाने पेट्रोलिंगवर असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. सायगाव ते दैठणा रोडवर असलेल्या सय्यद अहमदअली मुब्बशीर हाश्मी यांच्या शेतातील बांधावर दोन इसम चंदनाचे झाड चोरून तोडत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तात्काळ पंचांसह त्या ठिकाणी धाड टाकली. यावेळी दोन्ही आरोपी चंदनाचे झाड तोडताना जागीच आढळून आले.
पोलिसांनी घटनास्थळावरून एक मोटार सायकल, दोन कुऱ्हाडी असा एकूण ७० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले यांच्या पथकाने केली असून, पोलीस हवालदार शरद कदम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.