Breaking

बापलेकावर हल्ला ; पाच जणांवर गुन्हा

Updated: सप्टेंबर 16, 2025

By Vivek Sindhu

पैसे परत करण्याच्या बहाण्याने बोलावून घेत तरुणावर कोयत्याने हल्ला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – जुन्या भांडणाची कुरापत काढून पाच जणांनी बापलेकास लोखंडी पाईप, काठीने आणि दगडाने मारहाण करीत प्राणघातक हल्ला केल्याची घटना लाडेवडगाव (ता. केज) येथे घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केंद्रेवाडी (ता. अंबाजोगाई) येथील प्रदीप जीवराज केंद्रे यांची जमीन लाडेवडगाव (ता. केज) शिवारात असून त्यांचे कुटुंब हे लाडेवडगावला वास्तव्यास आहे. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या प्रदीप हे दुचाकीवरून शेतात गेले. तर त्यांचा मुलगा धीरज हा शेतात होता. सायंकाळी ६.१५ ते ६.४५ वाजेच्या दरम्यान त्यांच्या शेताच्या बाजूला असलेल्या राणूबाई वस्तीवरील रामहारी तुकाराम लटपटे याने जुन्या भांडणाची कुरापत काढून दगडफेक करीत शिवीगाळ करीत असल्याचा आवाज ऐकून ते त्यांच्याकडे गेले. याचवेळी या वस्तीवरील अंकुश लटपटे, रणजीत उर्फ डुग्या लटपटे, लहु लटपटे, दशरथ उर्फ बाळु शेप हे लोखंडी पाईप, काठी, दगड हातात घेऊन आले. त्यांनी प्रदीप केंद्रे व त्यांचा मुलगा धीरज केंद्रे यांना लोखंडी पाईप, काठी व दगडाने मारहाण करीत गंभीर जखमी केले. याप्रकरणी वरील पाच जणांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून तपास जमादार अनिल बिक्कड हे करीत आहेत.


Categories

Recent Posts