Breaking
Updated: मार्च 2, 2026
अंबाजोगाई पोलिसांची कारवाई
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई पोलिसांची कारवाई
अंबाजोगाई: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूची अवैध विक्री करणाऱ्या एका इसमावर अंबाजोगाई शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शेपेवाडी परिसरात राहत्या घरावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी एकूण ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस स्टेशनला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, शेपेवाडी येथील रविकिरण ज्योतीराम शेपे हा स्वतःच्या घरी प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा करून त्याची बेकायदेशीर विक्री करत होता. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन शेपेवाडी येथे छापा टाकला. यावेळी आरोपी रविकिरण ज्योतीराम शेपे (वय २८, रा. शेपेवाडी) हा घरात प्रतिबंधित मुद्देमाल घेऊन जाताना पोलिसांना आढळून आला. या छाप्यात पोलिसांनी गुटखा आणि सुगंधित तंबाखू असा एकूण ५५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मान्यतेनंतर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२३, २७४, २७५ आणि २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शरद जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, तेजेश वाहुळे, अमोल गायकवाड, सुशांत गायकवाड, भागवत नागरगोजे आणि युवराज राठोड यांच्या पथकाने यशस्वी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.