Breaking
Updated: सप्टेंबर 4, 2025
अंबाजोगाईच्या मुस्लिम समाजाचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाईच्या मुस्लिम समाजाचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अंबाजोगाई : परळी वैजनाथ रेल्वे स्थानक परिसरात चार वर्षीय चिमुकलीवर अमानुष बलात्काराची घटना घडल्याने संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील नराधमास फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी गुरुवारी (दि.०४) समस्त मुस्लीम समाज अंबाजोगाईतर्फे उपजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
दिनांक ३१ ऑगस्ट रोजी रोजगाराच्या शोधात परळी रेल्वे स्टेशन परिसरात येऊन दमून झोपलेल्या दाम्पत्याच्या चार वर्षीय मुलीवर परिसरामध्ये वावरणाऱ्या नराधमाने पाशवी अत्याचार केला होता. या घटनेने समाजमन संतप्त झाले असून, “संपूर्ण मानवजातीला काळिमा फासणारा हा प्रकार आहे. त्यामुळे आरोपीस कठोरात कठोर शिक्षा दिली जावी आणि त्याला फाशीच देण्यात यावी,” अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यासोबतच परळी तसेच राज्यातील रेल्वे स्टेशन परिसर, सार्वजनिक ठिकाणे व कार्यालयीन क्षेत्रात संशयित हालचाल करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी सतत लक्ष ठेवावे, मोकाट फिरणाऱ्यांवर प्रतिबंध घालावा आणि तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणीही मुस्लीम समाजाने केली आहे. समाजाने एकत्रितपणे उपविभागीय कार्यालयात येऊन हे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले.