Breaking

महिलेस मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ 

Updated: एप्रिल 11, 2026

By Vivek Sindhu

महिलेस मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल : आरोपी फरार

केज :- शेतात ज्वारीची कापणी करण्यासाठी जात असलेल्या महिलेला सार्वजनिक ठिकाणी काठीने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना केज तालुक्यात घडली असून एका विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र अद्याप पर्यंत आरोपी आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

दि. ८ रोजी मंगल प्रदीप कांबळे ही महिला दुपारी २:३० च्या सुमारास अभिमान काशीनाथ चाळक यांचे शेतात ज्वारी खुडण्यासाठी जात असतांना गणेश विक्रम चाळक याने तिला मस्साजी जाधव यांच्या घरा समोर सार्वजनीक रस्त्यावर जातीवाचक शिवीगाळ केली. त्याला शिव्या देण्याचे कारण विचारताच तो म्हणाला की, त्याने मंगलचा नवरा प्रदीप कांबळे याला त्याने ४ हजार ५०० रु  दिले आहेत. मी पैसे त्याला दिले आहेत तू मला विचारणारी कोण ? असे म्हणून त्याने मंगल कांबळे हिस काठीने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून केसाला धरून खाली पडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या प्रकरणी मंगल कांबळे यांच्या तक्रारी वरून गणेश विक्रम चाळक याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. १९२/२०२६ भा. न्या. सं. ११५(२),११८,(१) ३५१(२), ३५२ यासह ॲट्रॉसिटीचे कलम ३(१) (आर), ३(१) (एस), ३(३) (व्ही ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याचा तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम हे करीत असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.


Categories

Recent Posts