Breaking
Updated: ऑगस्ट 29, 2025
आष्टी तालुक्यात पती-पत्नीवर कुर्हाडीने हल्ला
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelआष्टी : तालुक्यातील कारखेल खुर्द येथे घरात डोकावल्याच्या कारणावरून वाद वाढत जाऊन कुर्हाडीने हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी पायल महादेव घुले (वय २०, रा. कारखेल खु., ता. आष्टी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २७ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या पतीने शेजारील आरोपींना “तुम्ही आमच्या घरात डोकावून का पाहत होता?” असे विचारले. यावरून आरोपी विठ्ठल काळुबा घुले, गणेश विठ्ठल घुले, लहु विठ्ठल घुले, मालन विठ्ठल घुले व पिंकी गणेश घुले (सर्व रा. कारखेल खु.) यांनी एकत्र येत फिर्यादीच्या पतीवर कुर्हाडीने वार करून डोक्यात गंभीर दुखापत केली. तसेच फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना काठी, चापट, लाथा व बुक्क्यांनी मारहाण केली. शिवाय शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी अंभोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.