Breaking
Updated: एप्रिल 9, 2026
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी अश्विनी देशमुख, स्वरूपानंद देशमुख यांचे उमेदवारी अर्ज दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – मस्साजोग (ता. केज) येथील ग्रामपंचायतीचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या पोटनिवडणूकीसाठी स्व. देशमुख यांच्या पत्नी आणि माजी सरपंच अश्विनी देशमुख यांच्यासह देशमुखांकडून पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्यावर सध्या तरी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. वर्षभरापासून रिक्त असलेल्या सरपंच पदाच्या पोटनिवडणूक लागली आहे. आता सरपंच पदाचा उर्वरित कार्यकाळ हा दीड वर्षाचा असून गावात २ हजार २२८४ मतदार आहेत. तर सरपंच पदाची निवडणूक जनतेतून (मतदारातून) होणार आहे. देशमुख कुटुंबाने ग्रामस्थांचा सल्ला घेत स्व. संतोष देशमुख यांच्या पत्नी स्व. अश्विनी देशमुख यांना उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ही निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र स्व. संतोष देशमुख यांच्या विरोधात पराभूत झालेले उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी ही पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय घेत गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर माजी सरपंच अश्विनी देशमुख यांनी तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती निधनामुळे उमेदवारी अर्ज साध्या पध्द्तीने दाखल केला आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २९ एप्रिल असून उमेदवार किती राहतात. यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.