Breaking
WhatsApp Group
Join Nowबीड :- दिनांक २५/०८/२०२० आणि दि. २८/०८/२०२० रोजी पिडीत अल्पवयीन मुलीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी रा. पाली ता.जि. बीड यास अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. शिंदे यांनी दोषी ठरवून २० वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ वर्षाचा सश्रम कारावास एवढया दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
या प्रकरणाची थोडक्यात हकिगत अशी की, फिर्यादी हि तिच्या आईसोबत मामाच्या गावी खंडोबाच्या यात्रेसाठी गेली असता तेथे तिची ओळख आरोपी सोबत झाली. तेव्हा त्याने फिर्यादीचा मोबाईल नंबर घेतला व दोघे व्हाटसअप, इस्टाग्राम वरून व फोन करून बोलू लागले त्यामुळे त्यांची चांगली ओळख झाली होवून मैत्री झाली त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दि. २५/०८/२०२० रोजी फिर्यादीची आई आणि आजी महालक्ष्मी सनानिमित्त गावी गेले होते तेव्हा फिर्यादी हि घरात एकटीच असताना अरोपी तेथे आला व तु आता माझी होणारी बायको आहेस.
असे म्हणुन तिचे सोबत बळजबरीने शारिरीक संबंध ठेवले. तसेच दि. २८/०८/२०२० रोजी फिर्यादीची आई बॅकेत गेली असता आरोपी पुन्हा फिर्यादीचे घरी आला व जबरदस्तीने तिचे सोबत शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीशी बोलणे बंद केले. तरी, आरोपी रा. पाली ता. जि. बीड याने फिर्यादीशी फोनवर, व्हाटसअप, इंस्टाग्रामवर बोलून फिर्यादीशी जवळीकता निर्माण करून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिची इच्छा नसतांना बळजबरीने तिच्याशी शारिरीक संबंध केले. अशा आशयाच्या फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे आरोपी विरूध्द कलम ३७६ (२) (जे) (एन) भादवी आणि कलम ४,६ बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंध कायदा सन २०१२ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला. सदर फिर्यादीवरुन तात्कालीन पोलीस उपनिरीक्षक एम.बी. तुपे यांनी या प्रकरणाचा तपास केला व जिल्हा व सत्र न्यायालय तथा विशेष न्यायालय, बीड येथे आरोपी विरूद्ध दोषारोपपत्र दाखल केले.
सदर प्रकरणाची सुनावनी मा. एस. आर शिंदे मॅडम अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश २ तथा विशेष न्यायाधिश बीड यांच्या न्यायालयात झाली. सदर आरोपी विरूध्द गुन्हा सिध्द करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे एकुण ०६ साक्षीदार तपासण्यात आले व सदर प्रकरणात पिडीता हिचा जबाब, वैद्यकिय पुरावा व कागदपत्रे यावरून व सहा. सरकारी वकिल अनिल बी. तिडके यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन मा. एस. आर शिंदे मॅडम अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश २ तथा विशेष न्यायाधिश बीड यांनी आरोपी यास कलम ५ (एल), ६ बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंध कायदा सन २०१२ अन्वये दोषी ठरवत २० वर्ष सश्रम कारावास व १०,०००/- रूपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सदर प्रकरणात सहा. सरकारी वकिल अनिल बी. तिडके यांनी काम पाहिले त्यांना अजय दि. राख जिल्हा सरकारी वकिल तथा शासकीय अभियोक्ता बीड यांनी मार्गदर्शन केले तसेच पैरवी अधिकारी ASI 539 सुरेश धोडिंराम जाधव व ए.एस.आय बिनवडे आणि पो.हे. कॉ बी.सी. निंबाळकर यांनी सहकार्य केले.
Last Updated: June 20, 2025