Breaking

केज पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न

Updated: एप्रिल 4, 2026

By Vivek Sindhu

जयंती उत्सव शांततेत व आनंदात पार पाडण्याचे आवाहन

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

जयंती उत्सव शांततेत व आनंदात पार पाडण्याचे आवाहन 

केज :- भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त केज येथे पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी पोलिस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी जयंती उत्सव शांततेत आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्याचे आवाहन करीत मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार डी जे व कर्णकर्ष आवाजाला बंदी असल्याने कोणत्याची परिस्थितीत उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कठोर कार्यवाई करण्यात येईल असे संकेत दिले.

दि. ४ एप्रिल रोजी सकाळी ११:०० केज पोलिस ठाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सवा निमित्त सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगराध्यक्ष सौ. सीताताई बनसोड, गटनेते हरूनभाई इनामदार, पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे, पोलिस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे, पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब रोडे. उपअभियंता सय्यद, यांच्यासह रिपाइंचे तालुकाध्यक्ष दीपक कांबळे, अशोक सोनवणे, लखन हजारे, योगेश गायकवाड, प्रा. हनुमंत भोसले, कसबे, दिलीप बनसोडे प्रविण मस्के, पद्मिण शिंदे, जोगदंड, दलिल इनामदार, राजू इनामदार, यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

या बैठकीत सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकट राम जयंती उत्सव समीतीच्या कडून आलेल्या सूचना यांच्या संदर्भात संबंधित विभागाला कळविले जाईल तसेच दारूबंदी याची कठोर अंमलबजावणी करून कोणत्याही परिस्थितीत डी जे वाजविले जाणार नाहीत. त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. असे सांगितले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.करताना पुतळ्याच्या परिसरात योग्य सोई सुविधा उपलब्ध असाव्यात या बाबत मार्गदर्शन केले तर नगराध्यक्ष सीताताई बनसोड यांनी महामानवांच्या जयंती पूर्वी शहरात सफाई मोहीम राबवून चौकाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तसेच मिरवणुकीदरम्यान पाण्याची व्यस्था केली जाणार असल्याचे सांगितले.

पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी महापुरुषांचे विचार हे स्फूर्तीदायक असल्याने त्याचे सर्वांनी पालन करावे. त्यांचे विचार आत्मसात करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात यावे. मिरवणुकीत आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नसल्याचे सांगून उल्लंघन झाल्यास कारवाई अटळ असल्याचे सांगितले.

यावेळी गट नेते हारून भाई इनामदार, दीपक कांबळे, दिलीप बनसोडे, लखन हजारे, भाई योगेश गायकवाड, प्रा. हनुमंत भोसले, कसबे यांनीही मार्गदर्शन केले.

बैठकीचे सूत्रसंचलन आणि प्रास्ताविक पोलिस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांनी केले.


Categories

Recent Posts