Breaking
Updated: सप्टेंबर 13, 2025
डोळ्यात चटणी टाकून महिलेचा विनयभंग ; पीडितेसह नातेवाईकांना मारहाण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – आपेगाव (ता. अंबाजोगाई) येथे जिल्हा परिषद शाळेसमोरील चौकात ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण करीत अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा उभारण्यात आल्याची घटना १२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ५ वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
आपेगाव येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील चौकात ग्रामपंचायतीच्या जागेत अतिक्रमण करून सिमेंट पिलरच्या चबुतऱ्यावर अज्ञात व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा १२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ५ वाजेच्या दरम्यान उभा केला आहे. अशी माहिती सरपंच प्रशांत कचरू सरवदे यांनी फोनवरून ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) सुनील साहेबराव निकम यांना दिली. त्यावरून त्यांनी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसह जाऊन पाहिले असता पुतळ्याचे पावित्र्य न राखता, त्याचे सुरक्षेची काळजी न घेता व पुतळा उभारण्यासाठी आवश्यक ती पुर्व परवानगी न घेता सिंमेटचे पिलर तयार करून त्यावर पुतळा उभा केलेला दिसुन आला. त्यानंतर त्यांनी वरिष्ठांना माहिती देऊन ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना पुतळा कोणी उभा केला ? याची विचारपूस केली. मात्र कोणी ही पाहिले नसल्याचे सांगितले. शेवटी ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) सुनील निकम यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास फौजदार भारत बरडे हे करीत आहेत.