Breaking
WhatsApp Group
Join Nowअंबाजोगाई – कृषी विभागाकडून रोजगार हमी योजने अंतर्गत सन २०२४ – २०२५ मध्ये मौजे राडी या एकाच गावात ४० शेतकऱ्यांनी २९ हेक्टर वर फक्त केळी या फळपिकाची लागवड केली आहे. शेतकऱ्यांनी त्यात आंतरपीक म्हणून रब्बी हंगामामध्ये गहू व मिरची असा यशस्वी प्रयोग करून आपली आर्थिक प्रगती साधली आहे. ऊस पिकाला पर्याय म्हणून केळी हे पिक देखील शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरत आहेत. या यशस्वी प्रयोगशील शेतकरी उमेश गंगने यांच्या शेतावर जाऊन अपर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे-जिरंगे यांनी पाहणी केली.
अपर जिल्हाधिकाऱ्यांनी केळी लागवड केलेल्या सर्व शेतकऱ्यांना आंतरपीक बाबत विचारपूस केली व त्यांच्याकडून रोजगार हमी योजना ही भविष्यात शेतकऱ्यांच्या आर्थिक फायद्यासोबत जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यास मदत होईल असे बोलल्या.
छतपत्री संभाजी नगर विभागात राडी गावातील शेतकऱ्यांनी २९ हेक्टर वर योजनेतून फळबाग लागवड करून आपले गाव विभागात द्वितीय क्रमांक पटकावला याचे सर्व श्रेय कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे आहे. त्याशिवाय हे शक्य होत नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सहाय्यक कृषी अधिकारी किशोर प्रभाकर अडगळे यांचा सत्कार केला. यावेळी सरपंच प्रशांत पाटील माजी सरपंच सतीश गंगने केळी लागवड शेतकरी ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समिती आजी माजी पदाधिकारी,मंडळ अधिकारी श्रीमती चव्हाण, ग्रामविकास अधिकारी श्री देशमाने,ग्राम महसूल अधिकारी उखळे उपस्थित होते
Last Updated: June 20, 2025