Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

भांडण मिटवायला तंटामुक्तीच्या अध्यक्षांनी बैठक बसवली

Updated: फेब्रुवारी 20, 2026

By Vivek Sindhu

अन् तंटामुक्तीच्या अध्यक्षा समोरच एकमेकांत काठीने मारामारी झाली....!

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अन् तंटामुक्तीच्या अध्यक्षा समोरच एकमेकांत काठीने मारामारी झाली

केज :- शेता मधून घराकडे जात असलेल्या भावाभावांचा रस्त्याचा वाद मिटविण्यासाठी तंटामुक्तीचे अध्यक्ष आणि भावाभावाची बैठक सुरू असताना भाऊ आणि त्यांच्या दोन मुलांनी एकाला लाठ्या काठ्यांनी मारहाण करून जखमी केले आहे.

केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कौडगाव येथील रामभाऊ मुंडे व ज्ञानदेव मुंडे या दोन सख्ख्या भावात घराकडे जाणाऱ्या शेतातील रस्त्या वरून भांडणे झाली होती. ते भांडण मिटविण्यासाठी दि. १९ फेब्रुवारी रोजी त्यांची गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आत्माराम वरणे यांनी ते दोन भाऊ, एका भावाची दोन मुले, गावातील प्रतिष्ठित व कुटुंबातील सदस्य यांच्यात बैठक सुरू असताना ज्ञानदेव मुंडे यांचा मुलगा लहू मुंडे हा म्हणाला, “तुला एक इंचही जमीन देणार नाही.”  असे म्हणून त्याने बाजूला ठेवलेली काठी हातात घेऊन चुलते रामभाऊ मुंडे यांच्या डोक्यात मारली. तसेच ज्ञानदेव मुंडे आणि लहू मुंडे या दोघांनी पुन्हा रामभाऊ मुंडे आणि त्यांचा मुलगा अशोक याला हातावर काठीने मारहाण केली. त्या नंतर ज्ञानदेव मुंडे यांचा दुसरा मुलगा आनंद मुंडे याने देखील रामभाऊ मुंडे आणि त्यांचा मुलगा अशोक मुंडे यांना मारहाण केली.

रामभाऊ मुंडे यांनी युसुफवडगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरुन ज्ञानदेव मुंडे, लहू मुंडे आणि आनंद मुंडे या तिघांच्या विरुद्ध गु. र. नं. ४४/२०२६ भा. न्या. सं. ११८(१), ३५१(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार उपनिरीक्षक गोविंद बडे हे तपास करीत आहेत.


Categories

Recent Posts