Breaking
Updated: नोव्हेंबर 3, 2025
करदोडे बदलण्याच्या वादातून मारहाण*
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : शहरातील बाजार परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका व्यापाऱ्यावर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी समीर सुधाकरराव कोथळे (रा. चनई, ता. अंबाजोगाई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मंडी येथील कुलस्वामिनी जनरल स्टोअर्ससमोर आरोपी अंकुश रावसाहेब कसबे (रा. अंबाजोगाई) याने करदोडे बदलून देण्याच्या कारणावरून वाद घातला. या वादातून आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ केली, चापट मारली तसेच हातातील चावीने फिर्यादीच्या डोक्यावर प्रहार करून दुखापत केली.
या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस करीत आहेत.