Breaking

अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना लागली उसाची गोडी

अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना लागली उसाची गोडी!

WhatsApp Group

Join Now

तालुक्यात लागवड क्षेत्रात ४ हजार ५०० हेक्टरची वाढ

अंबाजोगाई – कमी मेहनतीत ऊसच्या पिकात जास्त उत्पादन घेता यामुळे शेतकीर मोठ्या प्रमाणत ऊस लागवड करताता. परंतू २०२३ साली मॉन्सूनमध्ये कमी झालेला पाऊस, प्रकल्पांत अत्यल्प राहिलेला पाणीसाठा आदी कारणांमुळे तालुक्यातील ऊस क्षेत्रात मोठी घट झाली होती. तसेच, पाण्याअभावी उत्पादनातही घट येऊन मागील गळित हंगामात साखर उत्पादनालाही मोठा फटका बसला. मात्र, २०२४ मधील मॉन्सून काळात विक्रमी पाऊस झाला, त्यामुळे २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये खरीपअखेर तालुक्यात जवळपास दुप्पट उसाची लागवड झाली आहे. त्यामुळे यंदा तालुक्यात साखर उत्पादनात मोठी वाढ होण्याची चिन्हें आहेत.

अत्यल्प पावसामुळे २०२३ साली उसाच्या क्षेत्रात मोठी घट झाली होती. तालुक्यातील उसाचे सर्वसाधारण क्षेत्र गाळपाचा आणि नवीन लागवड असे मिळून ११ हजार ४०० हेक्टर इतके आहे. तालुक्यात मागील गळीत हंगामात सुमारे ६ हजार ९०० हेक्टरवर उसाची लागवड झालेली होती. ऊस क्षेत्र घटल्यामुळे मागील गळीत हंगामात जिल्ह्यातील साखर कारखान्यांना उसाचा मोठा तुटवडा जाणवला. त्यामुळे गाळप हंगाम अखेर मार्चमध्येच आटोपता घ्यावा लागला. २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये साखर उत्पादन तब्बल ५५ टक्क्यांनी घटले. यामुळे साखर उत्पादनालाही मोठा फटका बसला. ऊस गाळपही कमी झाले. दरम्यान, मागील वर्षी मॉन्सून काळात तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. परिणामी, कमी झालेली ऊस लागवड पुन्हा वाढण्यास मदत झाली. मागील वर्षी ६ हजार ९०० हेक्टरवर असलेले ऊस क्षेत्रात यंदा भर पडली आहे. म्हणजेच यंदा तब्बल ११ हजार ४०० हेक्टर उसाचे क्षेत्र झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या गाळप हंगामात साखर कारखान्यांना उसाचा तुटवडा जाणवणार नसल्याची स्थिती आहे. तसेच, साखर उत्पादनातही मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत.

परीसरातील प्रमुख साखर कारखाने
परीसरात रांजणी येथील नॅचरल शुगर, आनंदगाव सारणी येथील येडेश्वरी, केज येथील गंगा माऊली असे प्रमुख साखर कारखाने आहेत. अंबा साखर कारखाना बंद असल्याने शेतकऱ्यांना आपला ऊस दुर कारखान्याला नेण्याची वेळ येते. भाजपाचे युवा नेते अक्षय मुंदडा यांनी पानगाव येथील पनगेश्वर कारखाना ताब्यात घेतला आहे. अक्षय मुंदडा यांच्याकडे असलेल्या नेतृत्व क्षमतेमुळे या परीसरातील ऊस गाळपासाठी पानगावला जाऊ शकतो.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उसाचे क्षेत्र वाढलेले आहे. मागील वर्षी सुमारे ६ हजार ९०० हेक्टरवर उसाचे क्षेत्र होते. यंदा नवीन लागवड ४ हजार अं५०० असे मिळून ११ हजार ४०० हेक्टर इतके आहे.
– विजयकुमार पवार (मंडळ कृषी अधिकारी, अंबाजोगाई)

Last Updated: July 4, 2025

By Vivek Sindhu

About Author

विवेक सिंधु हे बीड जिल्ह्यातील सर्वात जलद आणी अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे, जे तुम्हाला तुमच्या भागातील घडामोडींचे ताजे अपडेट्स देते. आम्ही बीड जिल्यातील सर्व महत्वाच्या घटनांचे, कार्यक्रमांचे, राजकीय घडामोडींचे व समाजघटकांशी निगडित बातम्यांचे वस्तुनिष्ठ व जलद अपडेट्स देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.