Breaking

अंबाजोगाई तालुक्यात पावसाचे प्रमाण कमीच

Updated: July 18, 2025

By Vivek Sindhu

अंबाजोगाई तालुक्यात पावसाचे प्रमाण कमीच

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

तलाव, ओढे, विहिरींना अत्यंत कमी पाणी

अंबाजोगाई (प्रतिनिधी)- अंबाजोगाई तालुक्यात यंदा पावसाळ्यात समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही. जुलै महिना अर्धा उलटूनही पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमीच राहिल्याने शेतकर्‍यांसह सामान्य नागरिकही चिंतेत आहेत.
गेल्या काही दिवसांत ढगाळ वातावरण असूनही पाऊस झाला नाही.

परिणामी, मुख्य नद्या आणि ओढे कोरडे असून विहिरींच्या पाण्याची पातळी झपाट्याने घसरत आहे. पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनासाठीही पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सामान्य सरासरी पर्जन्यमानापैकी फक्त 40-50 टक्के पाऊस आत्तापर्यंत झालेला नाही. काही ठिकाणी अजूनही पेरणी योग्य पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत. जलस्त्रोत कोरडे, जलसाठ्यात दिवसेंदिवस पाण्याची कमतरता भासत आहे.

पेरण्या करून बसलेल्या शेतकर्‍यांच्या पिकांना म्हणावे तसे पावसाचे पाणी मिळत नसल्याने पिके म्हणावे तसे जोमात नाहीत. तलाव, विहिरी व बोरवेलला पाणी कमी असल्याने शेतकर्‍यांची सिंचन व्यवस्था कोलमडली आहे.
बीड जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्याने शेतकरी चिंतेत दिसून येत आहे.

हवामान खात्याने लवकरच पावसाची शक्यता वर्तवली असली, तरी जोवर खर्‍या अर्थाने जोरदार पाऊस होत नाही, तोवर परिस्थिती गंभीरच राहणार असल्याचे संकेत आहेत.