Breaking

अल्पवयीन मुलीचे अपहरण ; तरुणावर गुन्हा

Updated: नोव्हेंबर 4, 2025

By Vivek Sindhu

अल्पवयीन मुलीचे अपहरण ; तरुणावर गुन्हा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत अपहरण केल्याची घटना केज ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी एका २३ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही २६ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घरातून बाहेर शौचास गेली होती. ती परत घरी न आल्याने तिच्या आई – वडिलांनी तिचा नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र तिचा तपास लागला नाही. तर सतीश भागवत शिंदे (रा. बोरगाव (बु.) या २३ वर्षीय तरुणाने या अल्पवयीन मुलीस पळवून नेत अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी केज ठाण्यात दिली. या तक्रारीवरून सतीश शिंदे विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनात जमादार बाबासाहेब बांगर व गोविंद मुंडे हे तपास करीत आहेत.


Categories

Recent Posts