Breaking
WhatsApp Group
Join Nowकेज – एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना केज तालुक्यातील एका गावात उघडकीस आली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील एका गावातील १६ वर्षे ११ महिने १६ दिवस वयाच्या मुलीसह तिच्या घरातील सर्व जण २ जुलै रोजी रात्री ११.३० वाजता झोपले. त्यानंतर या अल्पवयीन मुलगी घरात दिसून न आल्याने तिचा नातेवाईकांसह इतरत्र शोध घेतला असता तिचा तपास लागला नाही. शेवटी आपल्या मुलीस अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार तिच्या आईने युसुफवडगाव पोलिसात दिली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे करीत आहेत.
Last Updated: July 5, 2025