Breaking
Updated: ऑगस्ट 29, 2025
अंबाजोगाईत तरुणाला दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : शहरातील कृषी महाविद्यालयाच्या मागे एका तरुणावर जुन्या वादातून दगड व लाथाबुक्क्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी जमीर महेबुब पठाण (वय २२,रा. पेन्शनपुरा, अंबाजोगाई) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास ते कृषी महाविद्यालयाच्या मागे असताना आरोपी उमेर फिरोज पठाण व फिरोज सत्तारखा पठाण (दोन्ही रा. पेन्शनपुरा, अंबाजोगाई) यांनी संगनमत करून त्यांच्यावर हल्ला केला. आरोपी उमेर पठाण याने “तु माझ्या आईस फोन का केला?” अशी कुरापत काढून फिर्यादीला शिवीगाळ केली व हातातील दगड डोक्यात मारून जखमी केले. तसेच डोळ्यावर बुक्की मारून दुखापत केली. त्याच वेळी आरोपी फिरोज पठाण याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकरणी अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार गुट्टे करत आहेत