Breaking

अज्ञात वाहनाच्या धडकेने हरणाचा मृत्यू

Updated: सप्टेंबर 3, 2025

By Vivek Sindhu

44 4

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – कळंब ते अंबाजोगाई रस्त्यावरील धनेगाव पाटीजवळ रस्ता ओलांडणाऱ्या हरिणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला.
कळंब ते अंबाजोगाई महामार्गावर येडेश्वरी साखर कारखान्यापासून जवळ आलेल्या धनेगाव पाटीवर एका भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने हरिणाला धडक दिली. वाहनाच्या धडकेने हरीण जागीच मृत्यूमुखी पडल्याची घटना २ सप्टेंबर, सोमवार रोजी दुपारी १.१५ वाजेच्या दरम्यान घडली. या अपघाताची माहिती युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी वनविभाग कळविली. धारूर वनविभागाचे वनसेवक वचिष्ठ भालेराव व त्यांच्या सहकाऱ्यांनी मृत हरीण ताब्यात घेतले. धारूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात शवविच्छेदन करून वन उपविभाग कार्यालय परिसरात दफन करण्यात आले.


Categories

Recent Posts