Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

केज तालुक्यात शेतात मजुरी करण्यासाठी जात असलेल्या महिलेचा विनयभंग

Updated: फेब्रुवारी 6, 2026

By Vivek Sindhu

आरोपी विरुद्ध विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आरोपी विरुद्ध विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, बचावासाठी महिलेने घेतला चावा

केज :- ऊस बांधणीसाठी शेतात जात असलेल्या एका विवाहित महिलेला रस्त्यात अडवून एकाने वाईट हेतुन तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला आहे. मात्र अन्यायाचा बदला घेण्यासाठी पीडित महिलेने त्या नराधमाला चावा घेतला. त्यामुळे त्याने तिला सोडून पळ काढला. या प्रकरणी त्या नराधमा विरुद्ध विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:१५ च्या सुमारास केज तालुक्यातील एक शेतमजूर महिला ही शेतात ऊस बांधणीसाठी रोजंदारीने काम करण्यास एकटीच पायी जात असताना त्या महिलेला एकाने रस्त्यात अडवून तिच्याशी झटापट करून त्याशी वाईट हेतुन गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी महिलेने त्याच्या तोंडाला चावा घेतला. त्यामुळे त्याने तिला सोडून पळ काढला. 

या प्रकाराची माहिती त्या महिलेने तिचे दीर आणि जाऊ आणि सासू यांना माहिती दिली.

त्या नंतर त्यांनी केज पोलिस ठाणे गाठून दिलेल्या तक्रारी वरून तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग करणाऱ्या अजहर अशरफ पठाण याच्या विरुद्ध गु. र. नं. ५७/२०२६ भा. न्या. सं. ७४,११५(२) यासह ॲट्रॉसिटीचे कलम ३(१)(आर),३(१)(डब्ल्यू)(i), ३(१) (डब्ल्यू)(ii) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

आता गावात तोंड दाखवायला जागा नाही !
नराधमाच्या तावडीतून सुटण्यासाठी महिलेने जबरदस्त प्रयत्न केला. त्याला प्रतिकार करीत असताना पिडीतेने त्या नराधमाच्या तोंडाला कडकडून चावा घेतल्याने तो जखमी झाला असल्याने आता त्याला गावात तोंड दाखवायला जागा उरली नाही.

दोन वर्षा पासून महिलेचा पती बेपत्ता
पीडित महिलेचा पती दोन वर्षा पासून बेपत्ता आहे. त्या बाबत तो बेपत्ता असल्याची नोंद पोलिसात केलेली असून अद्याप पर्यंत तो आढळून आलेला नाही. त्यामुळे त्या नराधमाने तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला.


Categories

Recent Posts