Breaking
Updated: फेब्रुवारी 16, 2026
आरंभ फाऊंडेशन व अहिल्या प्रबोधनी मंचचा स्तुत्य उपक्रम
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपिंपरी: महाशिवरात्रीचे औचित्य साधून श्री क्षेत्र उत्तरेश्वर पिंपरी येथे दर्शनासाठी आलेल्या लाखो भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आरंभ फाऊंडेशन आणि अहिल्या प्रबोधनी मंचच्या वतीने मोफत फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी आणि निस्वार्थी सेवा या उद्देशाने गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या या दोन्ही संस्थांनी यंदाही आपला वारसा जपत भाविकांना दिलासा दिला. श्री क्षेत्र उत्तरेश्वर पिंपरी येथे महाशिवरात्रीला भाविकांची मोठी मांदियाळी असते, हे लक्षात घेऊन हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.
आरंभ फाऊंडेशन आणि अहिल्या प्रबोधनी मंच केवळ सामाजिकच नव्हे, तर शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे. या उपक्रमाबाबत बोलताना फाऊंडेशनचे सचिव तथा मंचचे अध्यक्ष दीपक रमेश होळकर यांनी सांगितले की, समाजातील सर्व जाती-धर्मातील युवक आणि वृद्धांचा या उपक्रमांना मोठा पाठिंबा मिळत आहे. सामाजिक समतोल राखण्यासाठी आणि निस्वार्थ भावनेने सेवा घडवण्यासाठी आमची संस्था सदैव कटिबद्ध राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या उपक्रमाची मूळ संकल्पना ॲड. उत्तरेश्वर बाबुराव निंगुळे यांची असून, ती यशस्वी करण्यासाठी समाधान गाते यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना गोविंद पोपळगट, अजय पोपळगट, शंभू वीर, बाळकृष्ण निंगुळे आणि पवन बोऱ्हाडे यांनी मोलाची साथ दिली. कार्यक्रमाचे नेटके नियोजन निखिल मुसळे यांच्या व्यवस्थापन कौशल्यातून साकार झाले. या कार्यासाठी औदुंबर शिंदे यांनी साबुदाणा व शेंगदाण्याचे योगदान दिले, तर श्यामराव फाटक आणि राम फाटक यांनी केळी वाटपासाठी सहकार्य केले.
संपूर्ण उपक्रम श्री खंडोबा देवस्थानचे वासरिधारक गोपाळ देव निंगुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या उपक्रमात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचे आणि कार्यकर्त्यांचे आभार आरंभ फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. योगेश दिलीप चांगण यांनी मानले. भक्ती आणि सेवेचा हा संगम पाहून उपस्थित भाविकांनीही या उपक्रमाचे मोठे कौतुक केले आहे.