Breaking
Updated: मे 9, 2026
गेवराई तालुक्यातील कोळगाव जवळील घटना
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगेवराई – गेवराई तालुक्यातील कल्याण-विशाखापट्टणम हायवेवरील कोळगाव येथे शुक्रवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. भरधाव टेम्पोने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत पती-पत्नीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला. मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर कासार तालुक्यातील निमगाव मायंबा येथील तुकाराम बळे व त्यांच्या पत्नी हे दोघे मोटारसायकल (क्र. एमएच 14 सीझेड 7209) वरून कोळगावहून आपल्या गावी परत जात होते. दरम्यान, कोळगावजवळ समोरून भरधाव वेगाने येणार्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी रक्त आणि मांसाचा सडा पडल्याने अपघाताच्या भीषणतेची कल्पना येत होती. अपघातानंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मादळमोही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले. या प्रकरणी संबंधित टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री
उशिरापर्यंत सुरू होती. या दुर्दैवी घटनेमुळे निमगाव मायंबा गावावर शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.