Breaking

गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस ठोकल्या बेड्या

Updated: मे 9, 2026

By Vivek Sindhu

गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस ठोकल्या बेड्या

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड गंभीर गुन्ह्यातील सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पेठ बीड पोलिसांच्या डीबी पथकाने सापळा रचून बेड्या ठोकल्या आहे. शहरातील पेठ बीड पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये दाखल असलेला फरार आरोपी सय्यद मुक्तार उर्फ मुक्कन सय्यद मंजूर अली यास पोलिसांनी जेरबंद केले. संबंधित आरोपी हा तब्बल सहा महिन्यांपासून फरार होता. आरोपीचा शोध घेण्यासाठी डीबी पथकाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपीस ताब्यात घेण्यात आले.फरार आरोपी, अवैध धंदे तसेच सराईत गुन्हेगारांवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ बीड पो.नि.मारोती खेडकर,पोउनि श्री.शहा,पोह नितीन राठोड,अजित शिकेतोड, पोअं श्री.गुजर, श्री.परजने,श्री.गिरी व डीबी पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.


Categories

Recent Posts