Breaking

राज्यात पुढील चार दिवसात पावसाचे; मराठवाड्याला यलो अलर्ट

Updated: एप्रिल 22, 2026

By Vivek Sindhu

राज्यात पुढील चार दिवसात पावसाचे; मराठवाड्याला यलो अलर्ट

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पुणे – महाराष्ट्रात पुढील चार दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता असल्याचं पुण्यातील हवामान शास्त्रज्ञ एस.डी. सानप यांनी सांगितलं आहे. ते एबीपी माझासोबत बोलत होते. राज्यात आजपासून पुढील 4 दिवस दक्षिण विदर्भ,मराठवाडा मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट असल्याचं सानप यांनी सांगितलं. दुसरीकडे साताऱ्यात आणि पुण्यात मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली आहे. सातारा शहरात आणि ग्रामीण भागात पावसानं हजेरी लावली. उकाड्यामुळं त्रस्त झालेल्यांनी या पावसात भिजण्याचा आनंद घेतला.
हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार आजपासून पुढील 4 दिवस पावसाचे असतील, याकाळात वादळी वाऱ्यासह गारपीटही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र,विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता असल्याचं सानप यांनी सांगितलं.
भारतीय हवामान विभागानं आजपासून पुढील 4 दिवस दक्षिण विदर्भ,मराठवाडा मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागानं सांगली, सोलापूर, सातारा, धाराशिव,लातूर, परभणी,बीड चंद्रपूर,यवतमाळमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. एका बाजूला पाऊस तर दुसऱ्या बाजूला विदर्भातील बहुतांश जिल्ह्याचा तापमानाचा पारा 40 च्या पुढे राहणार असल्याची माहिती पुणे हवामान विभागाने दिली आहे.
सातारा शहरासह ग्रामीण भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्याने काही वेळ नागरिकांची तारांबळ उडाली. दिवसभराच्या कडक उन्हाने आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने मोठा दिलासा दिला.अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावर धावपळ उडाली, तर काही ठिकाणी गारां मोठा पाऊस झाला ढगांच्या गडगडात विजेचा कडकडासह अचानक आलेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडवली. मात्र गर्मीने त्रस्त झालेल्या नागरिकांनी या पावसाचा आनंद घेत भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. लहान मुलांसह नागरिकांनी पावसामध्ये भिजण्याचा आनंद लुटला आहे. अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून तापमानातही घट झाली आहे.
पुण्यामध्ये आज दुपारपासून ढगाळ वातावरण होतं आणि सायंकाळी गारांचा पाऊस सुरू झाला आहे. मात्र, ऐनवेळी आलेल्या पावसामुळं नागरिकांची धावपळ देखील झाली.