Breaking
Updated: एप्रिल 22, 2026
अवकाळीने धारूरला झोडपले; वादळी वाऱ्यामुळे शेतीचे मोठे नुकसान
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकिल्लेधारूर – धारूर तालुक्यात मागील दोन दिवसांपासून संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळत असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे काढणीस आलेली रब्बी पिके तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
( ता.२१ व २२) रोजी झालेल्या या वादळी पावसामुळे शेतात काढून ठेवलेले गहू, हरभरा, ज्वारी यांसारखी रब्बी पिके भिजून नुकसानग्रस्त झाली आहेत. तसेच फळबागांमध्ये आंबा, डाळिंब यांसारख्या पिकांवर वाऱ्याचा मोठा फटका बसला असून फळे गळून पडली आहेत. जोरदार वाऱ्यामुळे शेतात उभारलेली सौरऊर्जा यंत्रणा उखडून पडल्याच्या घटना घडल्या असून केज धारूर रोडवरील आनंद सावंत यांच्या विहिरीवरील इलेक्ट्रा कंपनीचे सौर पॅनल पूर्णतः उखडून पडले असून मोठे नुकसान देखील झाले आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.