Breaking
Updated: एप्रिल 22, 2026
मेव्हण्याने नवरा बायकोला विटाने मारहाण करून जखमी केले
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज :- माझ्याकडे पाहून तुम्ही का हसलात असे म्हणून वीटभट्टीवर काम करणाऱ्या एका वीटभट्टी कामगाराने चक्क त्याच्या मेव्हण्याच्या डोक्यात आणि मेव्हण्याच्या पत्नीला विटाने मारहाण करून जखमी केले. तसेच त्यांना जीवे मारून टाकण्याची धमकी दिली आहे.
लातूर जिल्ह्यातील खडगाव येथील कृष्णा सिताराम मगर हे पत्नी संगीता मगर आणि त्यांच्या दोन मुली व एक मुलगा यांच्यासह मागील आठ महिन्या पासून केज येथील वसीम इनामदार यांच्या विट भट्टीवर विट भट्टी कामगार म्हणून काम करीत आहेत. तसेच याच वीटभट्टीवर त्यांचा मेव्हणा उमेश मलकु भालेराव हा सुद्धा काम करीत आहे.
दि. २१ एप्रिल रोजी संध्याकाळी ६:०० वा. च्या सुमारास कृष्णा मगर व त्याची पत्नी संगीता हे बाजार करुन विटभट्टीवरील घरी गेले. ते दोघे आपसांत बोलत असताना कृष्ण मगर हसला तेव्हा त्यांच्या जवळच उभा असलेला मेव्हणा उमेश भालेराव म्हणाला की, तु माझ्यावर का हसला ? त्यावर कृष्णा मगर त्याला म्हणाला की, आम्ही आपसांत हसलो तुझा काही संबंध नाही. तेव्हा उमेश भालेराव याने त्याला शिवीगाळ करून विट डोक्यात मारुन दुखापत केली. तसेच संगीता मगर हिच्या पायावर विट मारुन मुक्का मार दिला. तसेच तुम्ही जर विटभट्टीवर दिसलात, तर तुमचे कुऱ्हाडीने तुकडे करतो अशी धमकी दिली.
कृष्णा मगर याच्या तक्रारी वरून उमेश भालेराव याच्या विरुद्ध गु. र. नं. २२७/२०२६ भा. न्या. सं. ११५(२), ११८, ३५१(२), ३५२ नुसार दाखल करण्यात आला आहे.
पोलिस हेडकॉन्स्टेबल महावीर सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.