Breaking
Updated: एप्रिल 21, 2026
जाब विचारला अन् तरुणावर विळ्याचा घाव घातला
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड-जिल्ह्यात लचखोरीचा कळस गाठण्यात आला असून आष्टीत आता एसीबीने कारवाई करत सहाय्यक अभियंताला ‘शॉक’दिला आहे. १८ हजारांची लाच घेताना एका महिला अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
बीड जिल्ह्यात लाचखोरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र एसीबीच्या कारवायातून स्पष्ट होतं आहे. आष्टीतील महावितरण विभागातील सहाय्यक अभियंता असलेल्या कोमल अर्जुन शिंदे या अधिकाऱ्याने तक्रारदारकडे सौर ऊर्जाचा सेट बसविल्यानंतर त्याचे ऑडिट आणि फंड रिलीज करण्यासाठी १८ हजारांची लाच घेताना एसीबीने दुपारी २ वाजता पकडले आहे. ही कारवाई पोलीस उपाधीक्षक सोपान चितमपल्ले, खरसाडे, बीडकर, पुरी यांच्या वतीने करण्यात आली आहे.