Breaking

जयभीमनगर येथे १३५ व्या भीमजन्मोत्सवाला उत्साहात सुरूवात

Updated: एप्रिल 13, 2026

By Vivek Sindhu

विविध प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

विविध प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – जयभीमनगर, अंबाजोगाई येथे १३५ वा भीमजन्मोत्सव -२०२६ व १९९ व्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शनिवारी पंचशील बुद्ध विहार, जयभीमनगर ते संघर्ष भूमी, अंबाजोगाई अशी समता बाईक रॅली काढून मोठ्या उत्साहाने सुरूवात झाली. जयभीमनगर, अंबाजोगाई येथील भीमजन्मोत्सव हा बाल मेळावा, महिला मेळावा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, विद्रोही कवी संमेलन, व्याख्यान,व भीमगीत गायन असे विविध बौद्धिक व समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेऊन साजरी केली जाते. त्यासाठी कसल्याही प्रकारची बाहेरील आर्थिक मदत न घेता, कोणालाही पैसे न मागता जे समाज बांधव स्वत:हून स्वाभिमान निधी देतात त्यातूनच दरवर्षी भीमजन्मोत्सव साजरा केला जातो, ही गौरवाची व इतरांसमोर आदर्श निर्माण करणारी बाब आहे.

जयभीमनगर मधील भीम अनुयायी हे महामानवांची जयंती दरवर्षी विविध प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करून साजरी करतात. हे दरवर्षीच दिसून येते. त्यामुळे परिसरातील नागरिक हे प्रबोधनाच्या कार्यक्रमास पाचही दिवस मोठ्या संख्येने बौद्धिक व ऊर्जादायी म्हणून मोठ्या संख्येने हजर असतात. अशा प्रकारचा विविध कलागुणांना वाव देणारा भीमजन्मोत्सव – २०२६ च्या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे. शनिवार, दि.११ एप्रिल रोजी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त पंचशील बुद्ध विहार येथे अभिवादन व पंचशील बुद्ध विहार ते संघर्षभूमी समता रॅली काढण्यात आली, त्याच्या नियोजनाची जबाबदारी अध्यक्ष संजयकुमार शिंदे, उपाध्यक्ष भाऊसाहेब कांबळे व प्रकाश बापू सरवदे यांनी पार पाडली. मंगळवार, दि.१४ एप्रिल रोजी भीमजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष मोहनराव कांबळे व ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत ऍड.शाम (भाऊ) तांगडे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर लगेचच अभिवादन व सामूहिक बुद्धवंदना लक्ष्मीबाई ज्ञानोबा रोकडे, आयु.दैवशाला ताई मधुकर खळगे, प्रतिभाताई सतीश बनसोडे व‌ अनिताताई रोहिदास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. त्यानंतर सकाळी ठीक ११.३० वाजता प्रबोधनात्मक व्याख्यान होणार असून त्याच्या अध्यक्षस्थानी ऍड.शाम (भाऊ) तांगडे हे राहणार असून प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य अरूण पवार हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार या विषयावर व्याख्यान देणार आहेत. बुधवार, दि.१५ एप्रिल रोजी बाल मेळावा व महिला मेळावा तर दु १ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये वेशभूषा, संगीत खुर्ची, गीतगायन, वक्तृत्व स्पर्धा व सायं.७ वाजता व्यक्त व्हा, मुक्त व्हा असा सर्वांसाठी खुला व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे, त्याची जबाबदारी कमिटी अध्यक्षा प्रतिभाताई सतीश बनसोडे, प्रमुख अतिथी म्हणून अनिताताई शिंदे राहणार आहेत. तर कमिटी अध्यक्षा सुनंदाताई भास्कर घाडगे, उपाध्यक्षा विद्याताई तुकाराम बुक्तर, सचिव प्रज्ञाताई दीपक वाघमारे व परीक्षक म्हणून सुप्रियाताई वसंत वाघमारे हे जबाबदारी पार पाडणार आहेत. गुरूवार, दि.१६ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता मुलांसाठी सामान्यज्ञान, रंगभरण व वक्तृत्व या स्पर्धा होणार असून त्याची जबाबदारी अध्यक्ष के.डी.सरवदे, उपाध्यक्ष धनराज वाहुळे, उपाध्यक्ष बी.एन.गायकवाड, तर परीक्षक म्हणून नितीन गायसमुद्रे, संजय पाडोळे, अमोल सोनवणे व समाधान धिवार हे राहणार आहेत. संध्याकाळी ७ वाजता विद्रोही कवी संमेलन होणार असून त्यामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातील नामवंत कवी संदेश शालिनी कर्डक, बबन सरवदे, सुमित गुणवंत, सुदेश जगताप, गजानन गावंडे हे सहभागी होणार आहेत. कवी संमेलनाची जबाबदारी कमिटी अध्यक्ष सुधाकर हातागळे, उपाध्यक्षा सुजाताताई भोजने, आशाताई वाघमारे व बाळासाहेब खांडके हे पाहणार आहेत. शुक्रवार, दि.१७ एप्रिल रोजी सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात येऊन सायं.८ वाजता महाराष्ट्रातील नामवंत शाहीर व सिनेअभिनेते चरणदादा जाधव, मुंबई यांचा आंबेडकरी शाहिरी जलसा सादर होणार आहे. शाहिरी जलसाची जबाबदारी कमिटी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.मधुकर खळगे, उपाध्यक्ष राजेश कांबळे,व दादाहरी कांबळे हे पाहणार आहेत.‌ प्रबोधनपर कार्यक्रमास सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने हजर राहून आदर्शवत असा भीम जन्मोत्सव – २०२६ यशस्वी करावा,‌ असे आवाहन जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मोहनराव कांबळे, उपाध्यक्ष लक्ष्मण खरात, संजय चव्हाण, सचिव बाबुराव बनसोडे, सहसचिव बाळासाहेब खांडके, कोषाध्यक्ष सुधाकर हातागळे, सहकोषाध्यक्ष रघुनाथ सरवदे, सदस्य सुजाताताई भोजने,व विजयाताई धिवार व सल्लागार समितीचे सदस्य ऍड.शाम (भाऊ) तांगडे, ज्ञानोबा रोकडे, प्रा.पी.वाय.फुलवरे, अच्युतराव जोगदंड, अशोक ताटे, प्राचार्य डॉ.मधुकर खळगे, एम.एम.गायकवाड, अशोक सरोदे, सतीश दादा बनसोडे, प्रकाश बापू सरवदे, बाबासाहेब समुद्रे, राणोजी वैद्य, गौतम कांबळे, संजयकुमार शिंदे, दिलीप ढोबळे, मोहन वाघमारे, श्रीमंत हजारे, तुकाराम बुक्तर व डॉ.एम.एच.कांबळे हे करीत आहेत.


Categories

Recent Posts