Breaking

महात्मा फुले यांनी शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली केली – राजकिशोर मोदी

Updated: एप्रिल 11, 2026

By Vivek Sindhu

महात्मा फुले यांनी शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली केली - राजकिशोर मोदी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

लोकविकास‌ महाआघाडीकडून क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – आधुनिक भारताचे शिल्पकार, थोर समाजसुधारक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी लोकविकास महाआघाडीकडून‌ त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना लोकविकास महाआघाडीचे प्रमुख नेते राजकिशोर मोदी यांनी महात्मा फुले यांनी शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली केली, स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण आणि शेतकरी – कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. आपण क्रांतीसूर्य महात्मा यांच्या विचारांची जोपासना करू असे आवाहन मोदी यांनी केले.

शनिवार, दिनांक 11 एप्रिल रोजी जयंती दिनाचे औचित्य साधून श्री योगेश्वरी शिक्षण संस्था कार्यालय परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना लोकविकास महाआघाडीचे प्रमुख नेते राजकिशोर मोदी म्हणाले की, महात्मा फुले यांनी तत्कालीन काळात प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली केली. त्यांचे विचार आणि कार्य आजही आपल्याला समताधिष्ठित समाज घडविण्यासाठी प्रेरणादायी आहेत. समाजात समता, बंधुता आणि शिक्षणाचा प्रकाश पसरविणारे थोर क्रांतीकारक महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती. या निमित्ताने समतेचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीदिनी कोटी-कोटी प्रणाम‌, अभिवादन करून उपस्थित आपण सर्वांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूयात असे ही आवाहन मोदी यांनी केले. त्याला उपस्थित सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

तर यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे म्हणाले की, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती. या निमित्ताने संपूर्ण केज विधानसभा मतदारसंघात व अंबाजोगाई शहर आणि तालुक्यात‌ विविध ठिकाणी सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे.‌ महात्मा फुलेंनी तत्कालीन रूढी-परंपरांना छेद देत सामान्य माणसाला स्वाभिमानाने जगण्याची नवी वाट दाखवली. त्यांच्या जयंतीनिमित्त आज येथे आपण त्यांच्या विचारांचे स्मरण करूयात. विद्येविना मती गेली हा संदेश देणाऱ्या या महान विभूतीला आज सर्वस्तरांतून मानाचा मुजरा करण्यात येत आहे. असे माजी आमदार साठे यांनी सांगितले.‌

याप्रसंगी राजकिशोर मोदी (नेते – लोकविकास महाआघाडी.), पृथ्वीराज साठे (माजी आमदार, केज विधानसभा, मतदार संघ.), दिनेश भराडीया (उपनगराध्यक्ष – नगरपरिषद, अंबाजोगाई.), सय्यद ताहेरभाई (गटनेता – नगरपरिषद, अंबाजोगाई.), नगरसेवक महेश कदम, महेश लोमटे, ऍड.विकास काकडे, मालू जोगदंड, आकाश कराड, राजपाल जावळे, नजीर उमरदराजखान पठाण, भिमसेन लोमटे, अकबरखाँ पठाण, दत्तात्रय सरवदे, सचिन जाधव, माजी नगरसेवक गणेश मसने, सुनील वाघाळकर, तानबा लांडगे, गोविंद पोतंगले, विशाल पोटभरे यांच्यासह अनेक मान्यवर, नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Categories

Recent Posts