Breaking

जुन्या भांडणातून फायटरने तरुणाच्या डोक्यात प्रहार

Updated: एप्रिल 10, 2026

By Vivek Sindhu

जुन्या भांडणातून फायटरने तरुणाच्या डोक्यात प्रहार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

वडवणी: जुन्या भांडणाची कुरापत काढून तीन जणांनी एका तरुणाला फायटरने मारून जखमी केल्याची घटना रुई पिंपळा येथे घडली आहे. गणेश श्रीकांत आथळे (वय २२) हा घरासमोर देवदर्शन करत असताना आरोपी शरद तुकाराम भागे, अनिता तुकाराम भागे आणि तुकाराम आकुबा भागे यांनी जुन्या भांडणाचे कारण काढून शिवीगाळ केली. गणेशने शिव्या देऊ नका असे सांगितल्याचा राग आल्याने शरद भागे याने हातातील फायटरने गणेशच्या डोक्यात मारून त्याला रक्तबंबाळ केले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या गणेशचे वडील आणि आत्यालाही आरोपींनी संगनमत करून मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. केज उपविभागीय पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Categories

Recent Posts