Breaking

रोपटे लावून अर्नवीचा झाला सैनिक शाळेत प्रवेश

Updated: एप्रिल 10, 2026

By Vivek Sindhu

रोपटे लावून अर्नवीचा झाला सैनिक शाळेत प्रवेश

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई – येथे प्रथम सुरू झालेल्या योगेश्वरी सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेणारी मुलगीच पहिली विद्यार्थीनी ठरली. अर्नवी भागवत पाठक हिचा गुरुवारी (दि.९) स्कूलच्या प्रांगणात रोपटे लावून प्रवेश झाला. यानिमित्त तिच्यासह पालकांचा शाळेतर्फे सत्कारही झाला.
येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या सैनिक स्कूलला शासनाची मान्यता मिळाल्यानंतर येत्या शैक्षणिक वर्षांपासून जून (२०२६) प्रत्यक्ष या शाळेची सुरूवात होईल. त्यासाठी इयत्ता सहावीच्या पहिल्या राउंडचे प्रवेशही सुरू झाले आहेत. त्यानुसार अर्नवी पाठक या विद्यार्थिनीचा योगेश्वरी सैनिक स्कूलमध्ये पहिला प्रवेश झाला. हा प्रवेश होताच मुलांमध्ये पर्यावरणाची जनजागृती व्हावी या उद्देशाने अर्नवीच्या हस्ते सैनिक शाळेच्या प्रांगणात रोपटे लावण्यात आले.

अगामी काळात या शाळेत शिक्षण घेणारी अर्नवीसह इतर मुले भारतीय सैन्यदलात अधिकारी होतील असा विश्वास प्राचार्य एस.पी. कुलकर्णी यांनी व्यक्त केला. यावेळी अर्नवीचे पालक भागवत पाठक, उपप्राचार्य व्ही.व्ही. कुलकर्णी, प्रा. आर.व्ही. कुलकर्णी, क्रीडा शिक्षक राहुल माने, संकेत तोरंबेकर, सुमित केजकर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

प्रवेश पुस्तिकेचे प्रकाशन

दरम्यान सैनिक स्कूलच्या प्रवेशाला लागणाऱ्या प्रवेश पुस्तिकेचे प्रकाशन प्राचार्य कक्षामध्ये झाले. यावेळी प्रा. गणेश पिंगळे, प्राचार्य एस.पी. कुलकर्णी, विजय वल्लमवार, योगेश्वरी महाविद्यालयातील प्राध्यापक आदींची उपस्थिती होती.

फोटो ओळी : अंबाजोगाई, योगेश्वरी सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेऊन शाळेच्या प्रांगणात रोपटे लावताना अर्नवी पाठक, प्राचार्य एस.पी. कुलकर्णी, अर्नवीचे पालक भागवत पाठक व इतर शिक्षक. (दुसरा फोटो) स्कूल च्या प्रवेश पुस्तिकेचे प्रकाशन करताना (तिसरा फोटो) कनिषा फडणीस या विद्यार्थिनीचा सत्कार करताना एस.पी. कुलकर्णी व केनिशाचे पालक.


Categories

Recent Posts