Breaking

जुन्या भांडणातून तरुणावर लाकडी दांड्याने हल्ला

Updated: एप्रिल 4, 2026

By Vivek Sindhu

जुन्या भांडणातून तरुणावर लाकडी दांड्याने हल्ला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: बीड तालुक्यातील पालवण रोडवरील विठ्ठल चौक येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाला लाकडी दांड्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. दत्ता रावसाहेब मस्के (वय ४२) यांनी याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. १ एप्रिल रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास ही घटना घडली.

आरोपी महेश संदीपान मस्के, शशिकांत शिंदे आणि त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांनी दत्ता मस्के यांना वाटेत अडवले. फोनवरून झालेल्या शिवीगाळचा राग धरून आरोपी महेश मस्के याने दत्ता यांच्या डाव्या हाताच्या पूर्वीच तुटलेल्या बोटावर लाकडी दांड्याने मारून पुन्हा जखमी केले. तसेच उजव्या पायावर आणि डोक्यात मारून जिवे मारण्याची धमकी दिली. पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार १२९९ जायभाये तपास करत आहेत.


Categories

Recent Posts