Breaking

गव्हाच्या पैशा वरून जातीवाचक शिवीगाळ : तिघा विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Updated: एप्रिल 4, 2026

By Vivek Sindhu

तिघा विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज :- केज तालुक्यातील एका गावात विकत घेतलेल्या गव्हाच्या पैशा वरून जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी तिघा विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील पाथरा ता. केज येथील लक्ष्मी पंडीत थोरात यांनी त्यांच्या गावातील एका कडून उधार गहू विकत घेतले होते. दि. २ मार्च रोजी रोजी ७:०० वाजता त्या त्यांच्या घरासमोरील झाडांची फुले तोडत असताना शामल अनंत पवार या त्यांना म्हणाल्या तुम्हाला फिरण्यासाठी पैसे आहेत पण मग आमचे पैसे कधी देणार ? यावरून दोघींना मध्ये भांडण झाले आणि शामल पवार यांनी लक्ष्मी चौरे यांना जातीवाचक शिवीगाळ केली तसेच त्यांचे पती आणि मुलगा अनुक्रमे अनंत बापुराव पवार आणि ऋषिकेश अनंत पवार यांनी पण शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

लक्ष्मी चौरे यांच्या तक्रारी वरून युसुफ वडगाव पोलिस ठाण्यात शामल पवार, अनंत पवार आणि ऋषिकेश पवार या तिघांच्या विरुद्ध गु. र. नं. ८५/२०२६ ॲट्रॉसिटीचे कलम ३(१) (एस), ३(२) (व्ही ए), भा. न्या. सं. ३५१(२), ३५३, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम हे तपास करीत आहेत.


Categories

Recent Posts