Breaking

माळेगांव येथील चौकात १ लाख ५९ रु. च्या देशी विदेशी दारु आणि कारसह एकजण ताब्यात

Updated: एप्रिल 4, 2026

By Vivek Sindhu

५ लाख ५९ हजाराचा मुद्देमाल ताब्यात

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

५ लाख ५९ हजाराचा मुद्देमाल ताब्यात

केज:- केज- कळंब रोडवर माळेगांव येथील चौकात पोलिसांनी अवैध्य चोरट्या दारू वाहतुकी विरुद्ध कारवाई करून अवैध्य चोरटी दारु वाहतूक करणाऱ्या इसमाला त्याच्या ताब्यातील कारसह ताब्यात घेत, ५ लाख ५९ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

दि. ३ एप्रिल रोजी केज उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे प्रभारी सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकट राम यांना एका गुप्त बातमीदार कडून केज ते कळंब रॉडने एक लाल रंगाची स्विफ्ट डिझायर गाडीतून देशी व विदेशी दारूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच व्यंकटराम यांनी ही माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलिस चेतना तिडके यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली चोरटी दारू वाहतूक करीत असलेली कार ताब्यात घेवून कारवाई करण्यासाठी सापळा रचला. ३ एप्रिल रोजी रात्री ७:०० वा. च्या सुमारास पोलिस हेडकॉन्स्टेबल विकास चोपणे, पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी कागदे, पोलिस कॉन्स्टेबल अशपाक इनामदार, पोलिस कॉन्स्टेबल सिद्दिक शहा यांच्या पथकाने कळंब कडून येत असलेली लाल रंगाची स्विफ्ट डिझायर व्हिडीआय (एम एच-१२/ई एक्स-३५१९) ही कार केज तालुक्याती माळेगांव येथील चौकात सापळा लावून थांबविली. तिचा चालक श्रीकृष्ण गोरख राख याला ताब्यात घेऊन पंचासमक्ष गाडीची झडती घेतली असता कारमध्ये ८८ हजार रु. देशी दारू आणि ७१ हजार ८६० रु ची विदेशी दारु बेकायदेशीर व अवैध्यरीत्या दारू वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी १ लाख ५९ हजार ८६० रु. ची देशी विदेशी दारु आणि चोरटी दारू वाहतूक करणारी कार असा एकूण ५ लाख ५९ हजार ८६० रु. चा मुद्देमाल ताब्यात घेत धाडसी कारवाई केली आहे.


Categories

Recent Posts