Breaking

अपघातग्रस्तांना जलद मदत मिळण्यासाठी बीड पोलिसांचे महत्त्वाचे पाऊल

Updated: मार्च 24, 2026

By Vivek Sindhu

प्रत्येक पोलीस ठाण्याला हाय-एंड टॅब्सचे वितरण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

प्रत्येक पोलीस ठाण्याला हाय-एंड टॅब्सचे वितरण


बीड – जिल्हा पोलीस दलाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून अपघातग्रस्तांना शासकीय मदत आणि विमा योजनांचा लाभ जलद गतीने मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. २४ मार्च २०२६ रोजी पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या हस्ते जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी दोन हाय-एंड टॅब्सचे वितरण करण्यात आले. या आधुनिक उपकरणांमुळे अपघाताची माहिती आता घटनास्थळावरूनच थेट शासन प्रणालीत नोंदवता येणार आहे.
रस्ते अपघातातील जखमी आणि मृतांच्या कुटुंबांना ‘प्रधानमंत्री राहत निधी’ तसेच इतर विमा योजनांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी अपघाताची अचूक नोंद होणे आवश्यक असते. यासाठी केंद्र शासनाच्या ‘आयआरएडी’ (IRAD) आणि ‘ई-डीएआर’ (e-DAR) या प्रणालींमध्ये माहिती भरणे गरजेचे आहे. नवीन टॅब्सच्या वापरामुळे ही माहिती अधिक पारदर्शक आणि जलद गतीने भरली जाईल, ज्यामुळे नागरिकांचे विमा दावे मंजूर होण्यास मोठी मदत होणार आहे.
टॅब्स वितरण कार्यक्रमावेळी अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांना अधिक स्मार्ट आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी बीड पोलीस कटिबद्ध असल्याचे यावेळी पोलीस अधीक्षकांनी आवर्जून सांगितले.


Categories

Recent Posts